या संकुचित, विद्रूप विचारांनी भारताच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान केलं आहे, हे जाणवून खूपच वाईट वाटू लागलं...
जो वर्ग राजकारणावर चर्चा कमीपणाचे लक्षण मानत होता, जो वर्ग राजकारणाला गटारातली घाण मानत होता, तोच वर्ग आज केंद्रातील सत्ताधारी राजकारण्यांच्या पुरता आहारी गेला आहे. त्याच्या अंधभक्तीने नात्या-नात्यांत, मैत्री-मैत्रीत अंतर पडू लागले आहे. एका नेत्याच्या भजनी लागून आपण उद्दाम, बेभान आणि आचार-विचारांनी असहिष्णू नि हिंसक होत चाललोय, याचीही जाण या वर्गाने गमावली आहे.......